शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने वृक्षारोपण

सांगोला (प्रतिनिधी):-शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
स्टेशन रोड येथील संघटनेच्या मुख्य कार्यालय पाच झाडांचे वृक्षारोपण व्यापारी सचिन सपाटे व महेश तारळकर यांच्या हस्ते या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
आपुलकी प्रतिष्ठानच्या पर्यावरण बचाव उपक्रमास, आव्हानास प्रतिसाद देत संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण करून एकादशीचा सन उत्साहात साजरा करण्यात आला .
या शहरातील प्रमुख मार्गावरून वर्षभरातील प्रमुख चार एकादशीनिमित्त अनेक पालखी सोहळे व दिंडी पायी जात ऊन वारा पावसाची तमा न बाळगता जातात त्यांना या मार्गात विसावा मिळावा म्हणून सदरचा उपक्रम अशोक कामटे संघटनेने राबविला असल्याचे सांगितले , पुढील काळात देखील समाज उपयोगी उपक्रम व वृक्षारोपण करणार असल्याचे नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले.स्टेशन रोड ,महात्मा फुले चौक ते नेहरू चौक या परिसरात वृक्षारोपणामुळे पुढील काळात तापमान संतुलित राहण्यास मदत होणार आहे, या भागातील व्यापारी व नागरिकांनी आपल्या जागेसमोर एक वृक्ष लागवड करावी. नवीन पिढीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याची आवड व गोडी निर्माण व्हावी, याकरिता शहीद अशोक कामटे संघटना कार्य , प्रयत्न सुरू आहेत.यावेळी शहीद अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते