सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थांतर्गत गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य च.वि. तथा बापूसाहेब झपके ४२ व्या स्मृती समारोहानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळा सांगोला संस्थेच्या वतीने उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा “गुणवंत शिक्षक” या पुरस्काराने सन्मान केला जातो.सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात केलेल्या कार्याबद्दल संस्थेच्या विविध शाखांमधून खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला- पाचवी ते सातवी वैभव विश्वेश्वर कोठावळे तर आठवी ते दहावी नरेंद्र सुधाकर होनराव,सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधून प्रा. शिवशंकर बापूराव तटाळे, कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोळा रफिक जब्बार मनेरी ,कोळा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल अस्मिता भीमराव माळी, नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज दिलावर नालसाहेब नदाफ ,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मंगल वसंत पाटील,सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला जगन्नाथ तुकाराम साठे , सांगोला विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल संतोष जयवंत बेहेरे,नाझरा विद्यामंदिर प्रशाला गुणवंत लिपिक हेमंत गजानन नलवडे,सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल गुणवंत सेवक तुषार वसंत पवार यांना जाहीर झाले असून कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४२ वा स्मृती सांगता समारंभात प्रसिद्ध वक्ते यजुर्वेंद महाजन यांच्या शुभहस्ते व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत..