महाराष्ट्र
मानवाने शाश्वत विकासाला सोबत घेऊन जीवन व्यतित करावे -डॉ. विधीन कांबळे

जुनोनी/प्रतिनिधी मानवाने आपले जिवन जगत असताना निसर्ग श्रेष्ठ मानावा शाश्वत विकासाला सोबत घेऊन आपले जीवन व्यतित करावे असे मत सांगोला महाविद्यालय, सांगोला येथील प्रणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.विधीन कांबळे यांनी व्यक्त केले. ते माणदेश महाविद्यालय, जुनोनी येथे वनसंवर्धन काळाची गरज या विषयावर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष मा. प्राचार्य सुबराव बंडगर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे भूगोल विभागप्रमुख प्रा. शरद पवार भूगोल विभागाच्या सहा. प्रा.पूनम अनुसे इ. उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले कि, झाडे लावता आली नाहीत तर उपलब्ध झाडे तोडू नका पक्षांची वास्तव्ये संपुष्ठात येत आहेत. ऑक्सिजन, सावली शुद्ध हवा तापमानवाढ नियंत्रण व औषधी साठी वनस्पती अतिशय उपयुक्त आहेत.
अध्यक्षीय मनोगता मध्ये मा. प्राचार्य सुबराव बंडगर म्हणाले कि,निसर्ग मानवाला प्रभावित करतो निसर्गाचा मनोरंजन पर्यटन यासाठी उपयोग करावा प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे म्हणाले की,नैसर्गिक मूल्ये विद्यार्थी आणि समाजाने जपावी मानवाची प्रगती निसर्गावर अवलंबून असते.यावेळी प्रा. मुकुंद वलेकर प्रा. तानाजी लवटे,शा. शि. संचालक प्रा. संतोष लवटे प्रा. सतीश फुले सायन्स विभातील सर्व प्राध्यापक तसेंच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शरद पवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सोनाली होवाळ यांनी केले, तर आभार प्रा.पूनम अनुसे यांनी व्यक्त केले.