तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मेडशिंगी प्रशालेचे दैदिप्यमान यश

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला क्रीडा संकुल या ठिकाणी दि.9/12/2022 ते 10/12/2022 रोजी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मेडशिंगी प्रशालेतील खेळाडूंनी वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केले.यामध्ये
17 वर्षे वयोगट(मुले):-1)अमन दिलावर मुल्ला-भालाफेक(प्रथम क्रमांक),थाळीफेक(द्वितीय क्रमांक),गोळाफेक(तृतीय क्रमांक)
14 वर्षे वयोगट(मुले):-1)गौरव सोपान वळकुंदे-थाळीफेक(प्रथम क्रमांक),गोळाफेक(द्वितीय क्रमांक)
17 वर्षे वयोगट(मुली):-1)सानिया नागेश ननवरे-भालाफेक(प्रथम क्रमांक), 2)स्वप्नाली दिपक वसेकर-थाळीफेक(द्वितीय क्रमांक) 3)ऐश्वर्या सुहास गाडेकर-गोळाफेक(तृतीय क्रमांक)
14 वर्षे वयोगट(मुली):-1)सानिका वसंत निमंग्रे-थाळीफेक(तृतीय क्रमांक),गोळाफेक(चतुर्थ क्रमांक)
मिळवून यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये तालुका स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणार्या प्रशालेतील खेळाडूंची जिल्हा स्तरावर होणार्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशस्वी खेळाडूंचे संस्था पदाधिकारी,प्रशालेचे प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,ग्रामस्थ यांनी कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय होणार्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.