ढोल ताशाच्या गजरात उत्कर्षच्या गणरायाचे विसर्जन…

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला च्या गणरायाची ‘विसर्जनाची मिरवणूक’ ढोल ताशाचा गजरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
टिपरी, टाळ, लेझीम, झांज या पारंपरिक वाद्यांच्या तालावर इयत्ता पहिली ते बारावी चे विद्यार्थी सहभागी असलेली ही श्री गणरायाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक उत्कर्ष विद्यालय – वाढेगाव नाका -देशपांडे गल्ली- विठ्ठल मंदिर -छत्रपती शिवाजी महाराज चौक- परीट गल्ली -शनी मंदिर -वाढेगाव नाका -उत्कर्ष विद्यालय सांगोला. या मार्गाने संपन्न झाली.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे टिपरी नृत्य, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी टाळ नृत्य, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक तर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक सादर करत मिरवणुकीची शोभा वाढवली. उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘सोशल मीडिया आणि आपण’ हे पथनाट्य सादर करत सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि त्याचा जपून वापर करण्याविषयी लोकजागृती केली.
उपक्रमशील शाळा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले उत्कर्ष विद्यालय सांगोला यांनी या मिरवणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे तसेच पॅरिस ओलंपिक मधील विजेत्या खेळाडूंचा देखावा सादर केला.
या भव्य मिरवणूक देखाव्यासाठी मा.डॉ संजीवनीताई केळकर,खजिनदार डॉ.शालूताई कुलकर्णी शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका दमयंती खर्डीकर, माजी मुख्याध्यापिका भोसेकर मॅडम,खडतरे मॅडम, पाटील मॅडम, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्याताई शास्त्री, उपमुख्याध्यापिका स्वरालीताई कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री भोसले सर, मुक्तानंद मिसाळ सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.