गुरु पौर्णिमेनिमित्त सांगोल्यातील ध्यानमंदिरात आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगोला ( प्रतिनिधी )- नामसाधना मंडळ सांगोला, यांच्या वतीने श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळची उपासना, प्रवचन, भजन संध्या, सनई वादन, कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शुक्रवार दि. १९/७/२०२४ रोजी सायं. ६.३० ते ८.०० ह.भ.प. श्री. सूर्याजी महाराज भोसले, पंढरपूर यांचे प्रवचन होणार आहे तर शनिवार दि. २०/७/२०२४ रोजी सायं. ६.३० ते ८.०० भजन संध्या व सनई वादन होणार आहे. (सादर कर्ते – श्री. दयानंद बनकर व साथीदार आणि सनई साथ – श्री. सोपान पारसे) रविवार दि. २१/७/२०२४ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० सकाळची उपासना व गुरुजनांचा सत्कार ध्यान मंदिरात होईल. तसेच सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ह. भ. प. श्री. संकेत भोळे बडोदा ( गुजरात ) यांचे नारदीय कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ श्री. दयानंद बनकर तर तबल्याची साथ श्री. सुधाकर कुंभार करणार आहेत. दि. २१/७/२०२४ रोजी कीर्तन झाल्यावर महाप्रसाद होईल.
वरील सर्व कार्यक्रम कार्यक्रम ध्यान मंदिर, वाढेगांव रोड, सांगोला येथे होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली असून या कार्यक्रमासाठी सांगोला शहर व तालुक्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नामसाधना मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.