न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.सुरुवातीला लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.दिपकराव खटकाळे,उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव, पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,पर्यवेक्षक दशरथ जाधव सर,पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे सर तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चैतन्य फुले सर म्हणाले की, अण्णा भाऊ साठे हे समाजसुधारक व लेखक होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० मध्ये झाला . त्यांचे मूळनाव तुकाराम होते .ते मांग जातीचे दलित होते. औपचारिक शिक्षण झाले नाही. जेमतेम दुसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाकले सर यांनी केले तर शेवटी आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.