फॅबटेक मध्ये थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु

सांगोला :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ इंजिनिअरिंग प्रवेशासाठी फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामार्फत इंजिनिअरिंग प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया दिनांक १५ /०७ /२०२४ पासून सुरु झाली असल्याची माहिती फॅबटेक इंजिनिअरिंग चे  प्राचार्य डॉ . रवींद्र शेंडगे यांनी दिली.

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सांगोला या महाविद्यालय मध्ये सिव्हील इंजिनिअरिंग, कॉम्पुटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन,व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा पूर्वीपासून आहेत . ए.आय. अॅण्ड डेटा सायन्स हि इंजिनिअरिंग शाखा पुणे , मुंबई , बारामती इ. शहरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मागील वर्षापासून सुरु आहे , परंतु आता या शाखेची सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमत: फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून परवानगी मिळाली आहे या शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात आता सद्यस्थित व भविष्यात नोकरीची अनेक संधी उपलब्ध आहे .

इंजिनिअरिंगसाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणे, फॉर्मची पडताळणी करणे आणि फॉर्म कायम करणे हि प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी उत्तम गतीचे १०० एमबीपीएस क्षमता असलेल्या इंटरनेट सुविधेसह सर्व बाबींनी सुसज्य असे शासनमान्य सुविधा केंद्र आहेत. तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च सांगोला येथे शासनमान्य थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया सुविधा सेंटर क्र. ६७५६ केंद्र मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेट देऊन प्रवेशासाठी नाव नोंदणी करण्याचे व अधिक माहितीसाठी ९५५२९१९०१७ / ८७६६९०९३९४   या नंबर शी संपर्क साधण्याचे आवाहन थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया चे अॅडमिशन समन्वय प्रा.संजय पवार  यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button