educationalsangola

थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये सुरु

ऑनलाईन अर्ज दिनांक १६/०७/२०२४ ते २६/०७/२०२४ दरम्यान स्वीकारले जाणार आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

इ.स.२००५ ची स्थापना असलेल्या सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे येथे
औषधनिर्माणशास्त्र डी.फार्मसी, बी.फार्मसी व एम.फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी
येथील थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन
सेंटर) म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
डॉ.दिलीपकुमार इंगवले यांनी दिली.

 

या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष
बी.फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे.या
केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे गुणपत्रके,प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रिया या बदल
सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.या प्रवेशप्रक्रियेसाठी व अर्ज पडताळणीसाठी
विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. त्यामध्ये

1) प्रथम पर्यायामध्ये सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे,पडताळणी व निश्चिती करणे.

2) दुसऱ्या पर्यायामध्ये विद्यार्थी महाविद्यालयास (अर्ज सुविधा केंद्र ( एफ.सी सेन्टर )) न जाता इंटरनेटचा वापर करून सुविधा केंद्र निवडणे व पडताळणी व निश्चिती करणे.

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये डी.फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे थेट द्वितीय वर्ष
बी.फार्मसी पदवी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक १६/०७/२०२४ ते २६/०७/२०२४ दरम्यान स्वीकारले
जाणार आहेत. डी.फार्मसी द्वितीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज / रजिस्ट्रेशन करण्यासाठी
https://dsp2024.mahacet.org या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या
सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी,अर्ज निश्चिती होणार

आहे.तरी विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रावर येताना आपले सर्व ओरिजिनल कागदपत्रे,दोन प्रति त्याच्या झेरॉक्स
सेट व फोटो सोबत घेऊन येणे.खुला प्रवर्गासाठी १००० रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये
प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाईन नेट बँकिंग द्वारे किंवा एटीएम कार्ड द्वारे महाराष्ट्र शासनाकडे भरणा
करायचा आहे.तरी फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्रावर येताना एटीएम कार्ड घेऊन येणे.ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत मोफत सखोल मार्गदर्शन
या महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे.तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी
याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.

 

याबाबत अधिक माहितीसाठी प्रा.एस.पी.जोकार (७२१९५१५९९८),
प्रा.ए.डी.माळी (९९७५९२८३५०), व श्री पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१) यांच्याशी संपर्क साधावा.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!