फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये झाला विठू नामाचा गजर

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित , फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेजमध्ये विठ्ठल नामाचा गजर बाल वारकऱ्यांनी केला.आषाढी एकादशीच्या निमित्ताने फॅबटेक प्रशालेत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्रशालेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
आषाढी एकादशीचे महत्त्व प्रशालेतील शिक्षिका सौ.शितल बिडवे यांनी सांगितले. सिनियर केजी मधील शिवन्या गायकवाड हिने मुक्ताई व ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगितली, इयत्ता तिसरीतील ईश्वरी गायकवाड हिने संत मुक्ताबाई यांच्या बद्दलची माहिती सांगितली, तर सिनियर केजी मधील राजनंदिनी गायकवाड हिने “राधा गं निघाली पाण्याला” ही गवळण सादर केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांची वेशभूषा धारण करून सुभाषिते, वचने सादर केले. विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचा रॅम्प वॉक घेण्यात आला.

त्यानंतर प्रशालेतील संगीतशिक्षक डॉ.अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी “या पंढरपुरात काय वाजत- गाजत”, इयत्ता तिसरीतील श्रीशैल मोरे याने “धरीला पंढरीचा चोर”, इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी “चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी”, इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी “विंचू चावला” हे भारुड तर इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी “रखुमाई रखुमाई” अशी समूहगीते सादर केली. प्रशालेतील नृत्य शिक्षक श्री.अतिश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी “अशी पंढरी पंढरी” , इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींनी “नाम विठोबाचे आले मनी”, इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींनी “रखुमाई रखुमाई” या गाण्यांवरती समूह नृत्य सादर केले.
प्रशालेच्या मैदानावरती विद्यार्थ्यांचे एक सुंदर प्रकारे रिंगण भरवण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या आवारातून विठू नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास पालक वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.संजय देशमुख यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शितल बिडवे यांनी केले तर आभार सौ.सुप्रिया फुले यांनी मानले.
हा कार्यक्रम फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.