संविधान हीच भारतीय समाजाची गरज : सूर्यगंध सर

सांगोला :-विद्यामंदिर हायस्कूल एखतपूर या ठिकाणी संविधानाचा जागर हा कार्यक्रम दिनांक १९/०७ २०२४ रोजी चार वाजता यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक माने सर रितेश कोळी सर कांबळे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक सूर्यगंध सर यांनी विद्यामंदिर हायस्कूल या ठिकाणी संविधानाचा जागर हा कार्यक्रम घेतला यावेळी बोलताना सूर्यगंध सर म्हणाले भारतीय समाजाला संविधानाशिवाय पर्याय नाही संविधान आमचा श्वास आहे आमचा प्राण आहे आमच्या धमन्यातील रक्त आहे यासाठी सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे वागले पाहिजे असे सांगत असताना सूर्यगंध सर यांनी एक ते पन्नास संविधानातील कलमाचे स्पष्टीकरण केले
हा कार्यक्रम करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे काका यांचे मोलाचे सहकार्य लाभले