चोरट्याने साठ हजार रुपये किमतीची पळविली गाय

सांगोला (तालुका प्रतिनिधी) अज्ञात चोरट्याने घरासमोर बांधलेली साठ हजार रुपये किमतीची जर्सी गाय चोरून नेल्याची घटना गुरूवार दि. ४ जानेवारी रोजी महुद ता.सांगोला येथे पहाटे ४वा.पूर्वी घडली आहे.
सुनंदा चंद्रकांत खांडेकर रा. महुद ता.सांगोला व पती चंद्रकांत खांडेकर असे मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजिवीका करतात त्यांच्याकडे तीन शेळ्या त्यांची पिल्ले तसेच ६ महिने गाभण जर्शी गाय व तिचे लहान पाडी पाळलेली होती. बुधवार दि.३ रोजी रात्री ११ वा. चे सुमारास घरासमोर पत्राशेडमध्ये बांधलेली जर्शी गाय व पाडी, शेळ्या बांधल्या होत्या पती चंद्रकांत खांडेकर हे नेहमी प्रमाणे गुरुवार दि.४ रोजी पहाटे ४ वाजता उठले असता त्यांना घरासमोरील पत्रा शेड मधे जर्शी गाय दिसून आली नाही. म्हणून त्यांनी पत्नी सुनंदा खांडेकर यांना उठवले व जर्शी कोठे दिसते का हे पाहू लागले नाही त्यांनी घराच्या आजूबाजूस, शेजारी, गावात चौकशी केली परंतु जर्शी गाय कुठेच मिळून आली नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की जर्शी गाय चोरीस गेली आहे.
याबाबत सुनंदा खांडेकर यांनी कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरासमोरील पत्रा शेड मधे बांधलेली ६० हजार रुपये किमतीची गाय त्यांचे संमतीवाचुन मुद्दाम व लबाडीने चोरुन नेली असल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.