कोळा येथील दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयाला “एम एसी”सी” केमिस्ट्री organic मान्यता-दीपकराव माने
सांगोला तालुक्यातील कोळ्या सारख्या ग्रामीण भागात संस्थापक दिपकराव माने यांनी शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत काळामध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे ग्रामीण भागात पहिलीच महाराष्ट्र शासनाच्या वतीने उच्चतंत्र शिक्षण विभागाच्या वतीने डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालय कोळा या संस्थेला सन २०२४-२५ या वर्षासाठी एम एस सी केमिस्ट्री organic ची संस्थेला मान्यता मिळाल्याने त्यांच्या कार्याचे कोळा ग्रामस्थातून कौतुक होत आहे. शासनाच्या वतीने नुकतेच संस्थेला पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपकराव माने मार्गदर्शक बाळासाहेब करांडे सचिव अमोल माने संचालक शरद माने यांनी माहिती दिली.
संस्थापक दीपकराव माने म्हणाले संस्थेचे मार्गदर्शक सर्व मित्रपरिवार ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संस्थेला एम एस सी केमिस्ट्री organic नव्याने मान्यता मिळाली आहे संस्थेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेमध्ये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील नामवंत केमिकल कंपन्या येणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणानुसार पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे असे सांगितले. परिसरातील एम एस सी केमिस्ट्री organic साठी जास्तीत जास्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संस्थापक दीपकराव माने यांनी शिक्षणासाठी मोलाचे काम केले असून कोळा नगरी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे या संस्थेमध्ये आकरावी बारावी सायन्स मान्यता प्राप्त केंद्र त्याचप्रमाणे ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सुरू असून बीए भाग एक भाग दोन भाग तीन बीएससी भाग एक भाग दोन भाग तीन सध्या अभ्यासक्रम सुरू असून व नव्याने यावर्षी २०२५ व २५ साठी एम एस सी केमिस्ट्री organic महाविद्यालयामध्ये सुरू झाल्याने संस्थेचे कौतुक होत आहे.
संस्थेचे प्रशस्त व सुसज्ज इमारत सुसज्ज वर्ग खोल्या भव्य क्रीडांगण तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज व परिपूर्ण विभागनिहाय प्रयोगशाळा, सीसीटीव्ही कॅमेरे कक्षेत महाविद्यालय, सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ संगणक प्रयोगशाळा कला व सांस्कृतिक प्रगती चालना वर्षभर विविध उपक्रम व्याख्याने राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना असे संस्थेची वैशिष्ट्य आहे.यावेळी संस्थेचे संस्थापक दिपकराव माने, संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब करांडे,संचालक शरद माने, सचिव अमोल माने, यांच्यासह माहिती देताना आदी उपस्थित होते..



