कोळे मठात रविवारी गुरुपौर्णिमेचे आयोजन
नाझरे (प्रतिनिधी):- गुरु गादी मठ कोळे ता सांगोला येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 31 वे पिठाधिपती श्री श्री 108 गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या गुरुत्वाकर्षणाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवार 21 जुलै रोजी पहाटे चार वाजता समाधीस लघु रुद्राभिषेक व महाआरती तसेच श्री श्री 108 गुरुमुर्ती निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर स्वामीजी यांचा दर्शन सोहळा होणार आहे तरी शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरुमुर्ती रुद्र पशुपती मठ संस्थान, वीरशैव समाज व कोळे ग्रामस्थ यांनी केले आहे