मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; सांगोला तालुक्यातून १०,६५० अर्ज दाखल
सांगोला – ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ‘च्या लाभ घेण्यासाठी गुरुवार १८ जुलै पर्यंत सांगोला शहर व तालुक्यातील ३,३५७ महिलांनी ऑनलाइन तर ७,२९३ महिलांनी ऑफलाइन असे एकूण सुमारे १०,६५० अर्ज दाखल केले आहेत दरम्यान येत्या रक्षाबंधनला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर एकाच वेळी दोन हप्ताचे सुमारे ३ हजार रुपये जमा होणार असल्याने महिलांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात १ जुलै ०२४ पासून राज्यातील विवाहित, विधवा ,घटस्फोटीत ,परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ‘ घोषणा केली आहे तदनंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून महिलांना सुरुवातीला कागदपत्राच्या जाचक अटी,नियम सक्तीचे केले होते त्यामुळे तहसील कार्यालय , तलाठी कार्यालयात तसेच महा-ई-सेवा केंद्रात सुरुवातीला महिलांनी शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड नाव असले पाहिजे, आधार कार्ड , बँक पासबुक आदी कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रात ब-याच अटी,नियमात शिथीलता आणून महिलांसाठी ही योजना सोपास्कर केली आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी महिला थेट ऑनलाईन अर्ज करीत आहेत तर अंगणवाडी सेविका मार्फत ही अर्ज भरून घेतले जात आहेत.