crimesangola

*सुनील कांबळे खून प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला ( प्रतिनिधी):- महूद ता. सांगोला येथील मृत सुनील कांबळे यांच्या खूनप्रकरणी कोठडीतील ३ आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवार १९ रोजी तपास अधिकारी यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश यांनी आरोपींना मंगळवार २३ जुलै पर्यंत पाच दिवस वाढीव कोठडी दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी दिली आहे.

मृत सुनील अनिल कांबळे -३२ या तरुणाचा किरकोळ भांडणाच्या कारणावरून धारदार हत्याराने डोक्यात मानेवर हातावर वार करून खून केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली होती चौघांपैकी ३ आरोपीना शुक्रवारी पंढरपुर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना शुक्रवार १९ जुलै पर्यत ८ दिवस पोलीस कोठडी दिली होती तर एक  अल्पवयीन आरोपीची सोलापूर येथील बाल सुधार गृहात रवानगी केली आहे.

दरम्यान अटकेतील तीन्ही आरोपीच्या पोलीस कोठडीची शुक्रवार १९ रोजी मुदत संपल्याने तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी तिघांना पंढरपूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना गुन्ह्याच्या पुढील सखोल तपास करणेकामी मंगळवार २३ जुलै पर्यंत पाच दिवसाची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!