मराठा समाजास ओ.बी.सी. मधून आरक्षन न मिळालेस लोकसभा निवडणुकीवर सामूहीक बहिष्कार

सांगोला :- मराठा समाजास ओ.बी.सी. मधून आरक्षन न मिळालेस लोकसभा निवडणुकीवर सामूहीक बहिष्कार टाकण्यासंदर्भात डोंगरगांव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार संतोष कणसे याना दि. ०५/०३/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रतील तमाम मराठा समाजास इतर मागासवर्ग प्रवर्गातुन सरसकट आरक्षण मिळावे व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या अंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत. या मागणीसाठी निवेदन देणेत आले. सदर निवेदनामध्ये डोंगरगांव तालुका सांगोला येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे “सगेसोयरे” संदर्भात काढलेल्या आध्यादेशाची तातडीने अंमल बजावणी करून मराठा समाजातील नागरीकांना सरसकट कुणबी हे प्रमाणपत्र द्यावे व अंदोलनावेळी झालेले गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सामुहीक बहिष्कार टाकुन डोंगरगावातुन अनेक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरणार असलेचे सांगितले.
सदर निवेदन मा. तहसिलदार साो श्री. संतोष कणसे यांनी स्वतः स्विकारून मराठा समाजाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्य सरकार पर्यंत पाठवणेची ग्वाही अंदोलकांना दिली. यावेळी डोंगरगावातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.



