महाराष्ट्र
शहीद जवान संस्थेच्या रक्तदान शिबिरात 108 रक्तदात्याचे रक्तदान

ध्यास जनसेवेचा या ब्रीद वाक्याने स्थापन झालेल्या शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने 26 /11 दिन व संविधान दिनाच्या निमित्ताने सांगोला शहरातील नेहरू चौक येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .26 /11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात 108 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रारंभी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन वीरपत्नी शितल वाघमोडे, वीर पत्नी मंगल आदलिंगे, वीर पत्नी सोनाली घाडगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी 26 /11 मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मेजर अविनाश पवार मेजर रवींद्र मराळ,मेजर न्रिमगे,सौ.न्रिमगे, मेजर उत्तम चौगुले ,सौ संगीता चौगुले, तायाप्पा माने, अरविंद केदार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना वीर पत्नी शितल वाघमोडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या की, 26 /11 /2008 रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेले हेमंत करकरे ,विजय साळस्कर ,अशोक कामटे अशे अनेक अधिकारी शहीद झाले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ शहीद जवान संस्थेने रक्तदान शिबिर आयोजित करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली व आमच्यासारख्या वीर पत्नीला बोलावून सन्मान दिल्याबद्दल संस्थेच्या कार्याचे कौतुक केले .अमर रहे अमर रहे ,वीर जवान अमर रहे, भारत माता की जय ,वंदे मातरम अशा घोषणा देऊन शहिदांचे स्मरण करण्यात आले .शहीद जवान संस्थेचे रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असून या संस्थेने बामणीचे शहीद झालेले बाबासाहेब वाघमोडे ,शहीद सुनील कोळी,(वासूद) शहीद अमित आदलिंगे,(कमलापूर) शहीद सचिन गायकवाड (कडलास )यांचे फलक रक्तदान शिबिरात लावण्यात आलेले होते. हे फोटो बॅनर पाहताना शहीद कुटुंबांचे डोळे पाणावले होते यावेळी वातावरण भावूक झाले होते. त्याचबरोबर सर्व महापुरुषांचे फोटोचे फलक लावण्यात आले होते
रक्तदान शिबिर प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, डॉक्टर सौ. निकिताताई देशमुख, माजी नगरसेवक आनंदा माने गजानन बनकर ,सोमेश यावलकर मा.नगरसेविका अनुराधा खडतरे, दादासो खडतरे सुरेश फुले ,वसंतराव फुले, रमेश फुले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था चे अध्यक्ष रवींद्र मराळ मेजर विजयसिंह पाटील मेजर भाऊसो लिगाडे ,मेजर रमेश विटेकर, संतोष ऐवळे, फयाज शेख, संजय काळे गुरुजी ,दत्तात्रय नवले, माजी सैनिक कल्याणकारी संस्था चे पदाधिकारी यांनी भेटी देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक अरविंद केदार व आभार प्रदर्शन अच्युतराव फुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष महिमकर, महादेव दिवटे, संदेश पलसे, अजित जाधव, देवा मासाळ इत्यादी पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
—————————————
शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे चिंचोली रोड बगीचा क्रमांक 47 नगरपरिषद आरक्षित जागेवर भव्य असा अमर स्तंभ उभा राहत असून त्याचे काम सध्या युद्ध पातळी सुरू असून अमर स्तंभ चे काम दोन महिन्यात काम पूर्ण होणार असून तो अमर स्तंभ सांगोला शहरातील देशप्रमी नागरिकांसाठी पाहण्यासाठी खुला होणार आहे. या संस्थेच्या कार्याचे सांगोला शहरातून कौतुक होत आहे.
अरविंद केदार
—————————————