महाराष्ट्र
जिल्ह्यातील सैनिक/माजी सैनिकांच्या कुंटुबियांना संरक्षण देणे कामी बैठकीस उपस्थित रहावे
सोलापूर जिल्हयातील सैनिक/माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 29 नोव्हेंबर 2024रोजी सकाळी 11.30 वाजता मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), यांचे कार्यालय, सोलापूर शहर येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सोलापूर जिल्हयातील सर्व सैनिक/माजी सैनिकांनी आपल्या अडीअडचणी विषयक संपूर्ण दस्तावेज दोन प्रतीमध्ये घेऊन मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), यांचे कार्यालय, सोलापूर शहर येथे सकाळी 10.30 पर्यंत उपस्थित राहावे असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.