सांगोला महाविद्यालयात मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, रिमेंम्बरन्स् डे समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने “संविधान दिवस साजरा” करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले आहे त्यामुळे आज देशात समता, बंधुता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे, तसेच हे वर्ष भारतीय संविधान स्वीकृतीचे अमृत महोत्सवी वर्ष असून, सर्व भारतभर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे संविधान यशस्वीरित्या 75 वर्षे पुर्ण करीत असल्यामुळे त्यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन डॉ. जमीर तांबोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. नवनाथ शिंदे व डॉ. सदाशिव देवकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. रामचंद्र पवार, रिमेंम्बरन्स् डे समितीचे प्रमुख डॉ.अमोल पवार यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.