वासूद गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला ( प्रतिनिधी): वासूद गावचा सर्वांगीण विकासासाठी मी कटिबध्द असून ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले. वासूद ता. सांगोला येथे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वासूद ता. सांगोला येथे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या बाबर मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पेव्हींग ब्लॉक, संरक्षक भिंत व सुशोभीकरणाचे उद्घाटन, नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आर. ओ. प्लॅन्टचे उद्घाटन, केदारवाडी प्राथमिक शाळेतील पेव्हिंग ब्लॉकचे उद्घाटन, केदारवाडी प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच वासूद ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल बाबर मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमास माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, सरपंच कलावती केदार, उपसरपंच अनिल (बंडू) केदार, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, योगेश खटकाळे, ग्रामपंचायत सदस्य जयश्री केदार, अंकुश खटके, विठाबाई चव्हाण, बबन ऐवळे, प्रा.संजय देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, माजी सरपंच भीमराव केदार, मारुती केदार, शिवाजी केदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे, सौदागर केदार, विष्णुपंत केदार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णा पाटील, मोहन साळुंखे, धनाजी शिंदे, माजी उपसरपंच बाळासाहेब केदार, सेनापती केदार, मेजर अरुण केदार, नवनाथ केदार, शंकर केदार, संभाजी चव्हाण, रणजितसिंह सावंत, अनिल केदार, बाळासाहेब सावंत, विश्वंभर केदार, दत्तात्रय ऐवळे, धर्मराज केदार, ग्रामसेवक आर.जे. घाडगे, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.