प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे‘ज्युवेल ऑफ भारत’ पुरस्काराने विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड सन्मानित

पंढरपूर (संजय कोकरे ): -शिक्षण, विश्वशांती, विश्वकल्याण व मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘ज्युवेल ऑफ भारत’ अर्थात ‘भारत देशाचे अनमोल रत्न’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार जगविख्यात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे प्रदान करण्यात आला.
आबू रोड येथील शांतीवन कॅम्पसमध्ये २२ ते २५ सप्टेंबर रोजी आयोजित ‘नवीन युगासाठी दैवी ज्ञान’ या विषयावरील ग्लोबल समिट २०२३ मध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी बी.के. जयंती दिदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेश येथील कृषी मंत्री सुर्य प्रताप साही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच आमदार निरज शर्मा, बीसीसीआयचे सदस्य पी.व्ही.शेट्टी, बी.के सुप्रिया दिदी, पीटर कुमार, राजयोगिनी बी.के. चक्रधर, नोयडा येथील अमर उजालाचे संपादक जयदीप कर्णीक, बी.के.आतम प्रकाश, बी.के मोहिनी दिदी उपस्थित होत्या.