राजकीय

इंदिरा गांधींच्या नातवाला बाळासाहेबांच्या नातूची साथ

काँग्रेस आणि शिवसेना या दोन भिन्न विचारसरणीचे नेते आज ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने एकत्र दिसले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीतून या यात्रेत आपला सहभाग नोंदवला. बाळासाहेबांचा नातू इंदिरा गांधी यांच्या नातवासोबत पायी चालतानाचं दृश्य कॅमेरात टिपण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. तसेच यात्रेसाठी आलेल्या हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनाही आदित्य ठाकरेचा सहभाग सुखावणारा होता. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सचिन अहिर यांनी देखील भारत जोडो यात्रेत उपस्थिती दर्शवली.नांदेड जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन राहुल गांधी यांची यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली.

रस्त्याच्या दुतर्फा फुललेली गर्दी, शेतकरी कामगारांच्या आशादायी नजरा, चिमुकल्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्नं आणि महिलांच्या मनी सुरक्षिततेची भावना… अशा सगळ्या भारलेल्या वातावरणात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चार राज्यातून प्रवास करुन महाराष्ट्रात दाखल झाली. नांदेडच्या देगलूरमध्ये राहुल गांधींचं आणि भारत जोडो यात्रेचं दणक्यात स्वागत झालं. राज्यात भारत जोडो यात्रा राज्यात येऊन आता चार दिवस झालेत. नांदेडमधून ही यात्रा आता हिंगोली जिल्ह्यात दाखल झालीये. मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातल्या लोकांचाही यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!