गुरूपौर्णिमा व गुरुवर्य बापूसाहेब झपके जयंतीनिमित्त सांगोला विद्यामंदिर येथे प्रतिमापूजन

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे गुरूपौर्णिमा व संस्थापक अध्यक्ष चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन संपन्न झाले.
सुरूवातीला गुरूपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते करण्यात आले व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उन्मेष आटपाडीकर यांनी गुरु महात्म्य व कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या अमोघ कार्याची माहिती दिली.
यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले, प्रशाला उत्सव विभाग प्रमुख बापूसो सावंत,ज्युनि.कॉलेज उत्सव विभाग प्रमुख प्रा.तानसिंग माळी यांचेसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.माधुरी पैलवान यांनी केले
महर्षी व्यासांनी वेदांचे संकलन केले आणि वेदांचे चार भाग केले. ते महाभारत, १८ पुराणे आणि १८ उपपुराणांचे लेखक होते.हे व्यासांचे महात्म्य तसेच आयुष्याच्या वाटेवर भेटलेले शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य संपन्न करतात असे शिक्षक समाजाचे व शाळेचे वैभव असतात कै.चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्याकडे गुरुवर्य, संस्थापक अध्यक्ष, शिक्षक या रूपात अनेकांना समाज, संस्कृती व शाळेचे वैभव वाढवणारे सद्गुण दिसले आहेत. आज गुरुपौर्णिमा व गुरूवर्य बापूसाहेब झपके यांची जयंती एकाच दिवशी असल्याने महर्षी व्यास व गुरूवर्य बापूसाहेबांच्या सदगुणांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले..



