sangolaeducational

आ. शहाजीबापूंचा पाठपुरावा, मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

HTML img Tag Simply Easy Learning    

आ. शहाजीबापूंचा पाठपुरावा, मतदारसंघातील रस्त्यांसाठी ६० कोटींचा निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दहा रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण, दहा वर्षे होणार देखभाल दुरुस्ती

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ संशोधन व विकास अंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील दहा रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील ४० किमीच्या दहा रस्त्यांसाठी ५६ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये तर दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ६२ लाख ८१ हजार रुपये असा एकूण ५९ कोटी ४४ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार असून दहा वर्षे होणार देखभाल दुरुस्ती होणार असल्याने मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील ४० किमीच्या दहा रस्त्यांसाठी ५६ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये तर दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीसाठी २ कोटी ६२ लाख ८१ हजार रुपये असा एकूण ५९ कोटी ४४ लाख ३८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सांगोल्यातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे.

मंजूर झालेले रस्ते व निधी पुढीलप्रमाणे, अजनाळे ते कोळवले-शिंदेवस्ती रस्ता सुधारणा करणे ५ कोटी ३ लाख ५३ हजार रुपये (३.६०० किलोमीटर), हलदहीवडी ते चव्हाणवाडी रस्ता सुधारणा करणे ४ कोटी ९१ लाख ४८ हजार रुपये (३.५५० किलोमीटर), महिम ते मरगरवस्ती फळवणी तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे ५ कोटी ०९ लाख ८४ हजार रुपये (३ किमी), हंगीरगे ते चव्हाणवस्ती रस्ता सुधारणा करणे ६ कोटी ९१ लाख ६८ हजार रुपये (४.२०० किमी), घेरडी ते मेटकरवाडी रस्ता सुधारणा करणे ३ कोटी ६१ लाख ६३ हजार रुपये (३.०५० किमी), खिलारवाडी ते बागलवाडी ते हलदहिवडी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी १३ लाख ४८ हजार रुपये (४.२५० किमी),
जुनोनी ते कुलकर्णी – नरळेवस्ती बुद्धेहाळ रस्ता सुधारणा करणे ६ कोटी ९७ लाख ४४ हजार रुपये (४.२०० किमी), राज्यमार्ग १४३ ते पळशी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ३८ लाख ९७ हजार रुपये ( ५.४३० किमी), जैनवाडी ते गार्डी रस्ता सुधारणा करणे ५ कोटी १८ लाख ९८ हजार रुपये (३ किमी), नाझरे ते सरगरवाडी उदनवाडी रस्ता सुधारणा करणे ७ कोटी ५७ लाख ६५ हजार रुपये ( ५.६५० किमी). मतदारसंघातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असणाऱ्या या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!