educationalsangola

*सन्मार्ग,सद्वर्तन व सहनशीलतेतून आयुष्यात यश- उपायुक्त संजयकुमार राठोड*

*सांगोला विद्यामंदिरमध्ये शिष्यवृत्तीधारक 65 विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न* 

HTML img Tag Simply Easy Learning    
सांगोला (वार्ताहर):सदैव सन्मार्गाचा वापर करा, नेहमी सद्वर्तनी रहा, सहनशीलतेने जीवन जगा यामुळे आयुष्यास यश प्राप्ती होते असे विचार संजयकुमार राठोड (उपायुक्त- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे) यांनी मांडले. ते सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे पूर्व उच्च प्राथमिक (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक (इ.8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा-2024 मधील राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व पालकांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ.पी.बी. गव्हाणे (पशुधन विकास अधिकारी, सांगोला), संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव म.शं.घोंगडे सर, खजिनदार शं.बा.सावंत सर, प्राचार्य अमोल गायकवाड, विकास शिंदे सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 पुढे बोलताना स्कॉलरशिप ही शालेय जीवनातील एकमेव शासकीय स्पर्धा परीक्षा असून एम.पी.एस.सी. व यू.पी.एस.सी.चा पाया विद्यार्थ्यांच्या जीवनात ही परीक्षा निर्माण करते. शैक्षणिक गुणवत्ता जपताना संस्था, विद्यार्थी व शिक्षक हा त्रिकोण या संस्थेने उत्तम जुळवला असल्याचे संजयकुमार राठोड यांनी सांगितले. या शाळेच्या नावातच सांगोला असल्याने स्वतःच्या नावाबरोबर तालुक्याचे नावही शाळेच्या माध्यमातून उज्वल होत असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. शाळेतील टीमवर्क पाहूनच यशाची व्याप्ती वाढली असून शिक्षक मनापासून काम करताना विद्यार्थ्यांची एकप्रकारे जबाबदारीच घेतात व अभिमान बाळगावा असे विद्यार्थी तयार करतात याबद्दल समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले.
 विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना क्षेत्र कोणतेही निवडा पण कष्ट व प्रामाणिकपणा असल्यास समाधानाचे जीवन मिळते असे सांगत आजच्या युगात शिक्षकांनी राजसत्तेविषयी विद्यार्थ्यांचे मत सकारात्मक बनवल्यास भविष्यात चांगले राजकारणी तयार होतील व देश प्रगतीपथावर राहील असे मत त्यांनी यावेळी मांडले.
————————————————————-
*अधिकारी पदावर कार्यरत असल्याने बऱ्याच शाळांची संपर्क आला परंतु या शाळेतील शिक्षक भरतीची ‘विना-डोनेशन’ पद्धत पाहून भारावून गेलो, संस्थेचा नावलौकिक ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात अनुभवले. अशा आदर्श संस्थेचा व पदाधिकाऱ्यांचा उल्लेख आवर्जून इतर ठिकाणी करेन.*
 मा.संजयकुमार राठोड ,उपायुक्त- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
————————————————————-
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रातःस्मरणीय, परमपूज्य कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. प्रास्ताविकात प्राचार्य अमोल गायकवाड यांनी शिष्यवृत्ती निकालाचा गेल्या तीन वर्षातील मागोवा घेत एकूणच यशामागे विद्यार्थी-पालक-शिक्षक-संस्था हा समन्वय महत्त्वाचा असून पदाधिकाऱ्यांच्या प्रभावी प्रोत्साहनामुळेच गुणवत्तेचा आलेख वाढत असल्याचे सांगितले. यावेळी राज्य गुणवत्ता यादीतील 8 व जिल्हा गुणवत्ता यादीतील 57 अशा एकूण 65 विद्यार्थी व त्यांच्या पालकांना यथोचित सन्मानित करण्यात आले.
 नागेश पाटील (विभाग प्रमुख), चैतन्य कांबळे, अश्विनी साळुंखे, मेहजबीन मुलाणी, अशितोष नष्टे, सुवर्णा साळे, काकासाहेब नरुटे, शितल मेहेरकर, दत्तात्रय कांबळे, धनश्री ढोले, रूपाली देशमुख या इयत्ता पाचवीच्या व रमेश बिले (विभाग प्रमुख) उमेश नष्टे, शुभांगी पलसे, उज्वला कुंभार, सचिन बुंजकर, महेश ढोले या इयत्ता आठवीच्या मार्गदर्शक शिक्षकांसह संस्था व प्रशाला बाह्यपरीक्षा विभागाचे नामदेव खंडागळे व वैभव कोठावळे यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ओवी तारळेकर व जिज्ञासा घाडगे यांनी शिक्षक आणि शाळा यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही यशस्वी झाल्याचे आपल्या विद्यार्थी मनोगतातून नम्रपणे नमूद केले.
————————————————————-
*माझी कन्या कु.ओवी इ.1लीपासून विद्यामंदिरची विद्यार्थिनी असून तिला ‘इ.5 वी शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी’ ही स्वतंत्र ओळख या शाळेतील शिक्षकांनी मिळवून दिली.* *गेली काही वर्षे विद्यामंदिरमधील नोकरीच्या अनुभवावर सध्याच्या शाळेत कार्यरत असताना नवखी असून सुद्धा माझी मते विचारात घेतली जातात हे केवळ विद्यामंदिरच्या माझ्यावरील संस्कारामुळे..* 
सौ.कोमल तारळेकर (खामकर)
 सहशिक्षिका-लोकमान्य विद्यालय, माणकेश्वर, ता.भूम.
————————————————————–
पाहुण्यांची ओळख सुनील भोरे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद यांनी मानले. सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्यपरीक्षा विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना पालकांचा सन्मान, राज्य गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांना सां.ता.शि.प्र.मंडळाकडून प्रत्येकी  रोख रु.1000 चे पारितोषिक, सर्व विद्यार्थ्यांना मेडल्स, प्रशस्तीपत्रके, महेश ढोले व शुभांगी पलसे या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख पारितोषिके, विद्यार्थ्यांच्या फोटोसह वृत्तपत्रांमधील व डिजिटल बॅनरवरील शुभेच्छा व पालकांचा पाहुणचार यामुळे विद्यार्थी घडवण्याबरोबर कौतुक करण्यातही शाळा अग्रेसर असल्याचे पालकांनी समाधानाने सांगितले.*
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!