सांगोला महाविद्यालयात गु्रुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाची स्थापना करणारे गु्रुवर्य कै.चं. वि. तथा
बापूसाहेब झपके यांच्या 102 वी जयंती निमित्त रविवार दि. 21 जुलै 2024 रोजी
महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण
करण्यात आला.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले़ यांनी गु्रुवर्य कै.चं. वि. तथा बापूसाहेब झपके
यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच सांगोला तालुक्यात उच्च् शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये
महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विविध विदयार्थ्यांच्या यशामध्ये
बापूसाहेबांचे कार्य कारणीभूत आहे. गु्रुवर्य कै.चं. वि. तथा बापूसाहेब हे थोर गांधी
वादी, स्वातंत्र्यसेनानी व शिक्षणमहर्षी होते. त्यांचे कार्य हे सर्वांना उत्तुंग यशाकडे नेणारे आहे असे
मत व्यक्त केले.
यावेळी गु्रुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जीवन कार्याविष्यीची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री.प्रकाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल पवार व श्री. राहुल ढोले यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक व
शिक्षकेत्त्र कर्मचारी उपस्थित होते.



