नाझरा विद्यामंदिर मध्ये संविधान जागर कार्यक्रम संपन्न

नाझरा(वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान जागर हा कार्यक्रम संपन्न झाला.न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथील पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध यांनी संविधान जागर हा कार्यक्रम सादर केला.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बी.एस.माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे उपस्थित होते.
यावेळी सूर्यगंध यांनी संविधानाचा मूलभूत गाभा घटक,संविधानाच्या माध्यमातून आपले जगणे कशा पद्धतीने आनंदमय होऊ शकते, संविधान प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार, त्याचबरोबर संविधानातील विविध कलमांची माहिती त्यांनी दिली. विविध उदाहरणे व कवितांच्या माध्यमातून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागृती निर्माण केली. संविधानाची अतिशय विस्तृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याने उपस्थित शिक्षकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले गेले.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.माने यांच्या हस्ते तानाजी सूर्यगंध यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील व जुनिअर कॉलेज मधील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



