solapur

1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)

HTML img Tag Simply Easy Learning    
मा. भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेऊन दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision) राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हाधिकारी कुमार अशिर्वाद, यांचे मार्गदर्शनाखाली विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यांत येत असून त्याअंतर्गत मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील अनुभव पाहता ज्या मतदान केंद्रावर मतदान करताना आलेल्या अडी अडचणी त्रुटी दूर करणेच्या उद्देशाने मतदान केंद्राचे सुसूत्रिकरण करणेचे काम हाती घेण्यांत आलेले आहे. ज्या मतदान केंद्रावर 1350 पेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात अशा मतदान केंद्रावरील मतदान कमी मतदान अत्तलेल्या त्याच इमारतीत स्थलांतरीत करणे, गरजेनुसार नवीन मतदान केंद्राची निर्मिती करणे अशी कामे करणेत येत आहेत, जेणे करुन मतदारांना रांगामध्ये न उभे राहता सुलभ मतदान करता येईल.राज्यातील काही जिल्हयांमध्ये मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्यांत आल्याचे दिसून आले अशा मतदारांची नावे मतदान यादीत समाविष्ट करुन घेण्याचे काम सद्या सुरु असून ज्या मतदारांची नांवे मतदार यादीत नाहीत अशा मतदारांनी त्यांचे मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क साधून त्यांचे नांव समाविष्ट करुन घ्यावे. अथवा Voter Help Line या अॅपवरुन किंवा Voters.eci.gov.in या संकेतस्थळावरुन नवीन नांव नोंदणीसाठी नमुना 6 चा अर्ज ऑनलाईन भरुन आपले नांव नोंदविता येईल. तरी प्रत्येक मतदाराने ऑनलाईन सर्चइंजिनचा उपयोग करुन आपले नांव मतदार यादीत समाविष्ट आहे किंवा नाही याची आत्ताच खात्री करुन घेणे आवश्यक आहे.
दिनांक 25 जुलै 2024 रोजी नव्याने अद्ययावत केलेली मतदार यादी प्रसिध्द करणेच्या सूचना दिलेल्या आहेत. मतदार यादी प्रसिध्द झालेनंतर दिनांक 25 जुलै 2024 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत 248 सोलापूर शहर उत्तर व 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील नागरीकांना मतदार यादीबाबतच्या दावे व हरकती उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 अथवा तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील निवडणूक शाखेत दाखल करता येतील. नागरीकांनी असे दाखल केलेले दावे व हरकती दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत मा. मतदार नोंदणी अधिकारी विहीत सुनावणीअंती निकाली काढतील व व त्यानंतर दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
तरी 248 सोलापूर शहर उत्तर व 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील सर्व नागरीकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, नागरीकांना आपले नांव मतदार यादीत समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करावी, आपले नांव समाविष्ट करुन घेणेसाठी अर्ज सादर करावे, तसेच मतदार यादीतील नांवाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांच्या हरकती वर नमूद कार्यालयांत नोंदवून दिनांक 1 जुलै 2024  या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) कार्यक्रमांत आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन  मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र 1 सदाशिव पडदुणे,  व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील,  यांनी केले आहे. 00000
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!