crime

दुचाकीवर पोतं, पोत्यात तलवारी; पोलिसांनी सापळा रचून केली अटक, 10 तलवारी जप्त

HTML img Tag Simply Easy Learning    

कोल्हापुरातील विशाळगडावर अतिक्रमण हवटिण्याच्या मोहिमेवरुन चांगलच राजकारण घडल्याचं पाहायला मिळालं.  झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर येथील गजापूर गावात आणि परिसरात जातीय तणाव दिसून आला. त्यामुळे, शांतता राखण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांकडून केलं जात असून पोलिसही कडक कारवाई करत आहेत. कोल्हापूरसह सांगलीतही पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. त्यातच, सांगली  शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारदार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 10 तलवारी आणि एक दुचाकी असा 65 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

भगतसिंग विक्रमसिंग शिख असे तलवारींसह पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती. त्यातच एक तरूण आष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलिसांना  मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून रचून शिख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर, त्यामध्ये तलवारी सापडल्या आहेत. त्यानंतर त्याला अटक करुन पोलिसांनी त्याच्याकडून दुचाकी आणि तलवारी जप्त केल्या आहेत. दरम्यान, सदर व्यक्ती विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!