महाराष्ट्र

इनर व्हील सांगोला क्लबतर्फे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न*

पंढरपूर आषाढी वारी निमित्त पायी दिंडी आदर्श बालक मंदिर सांगोला या ठिकाणी दि.3 जुलै 2025 रोजी मुक्कामी होती. यामध्ये इनरव्हील क्लब सांगोला यांच्यातर्फे वारकऱ्यांचे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आले.

उपस्थित सर्व वारकऱ्यांचे डॉ.प्रभाकर माळी, डॉ. अश्विनी माळी मॅडम , डॉ.रूपाली बुरांडे मॅडम यांनी तपासणी करून उपस्थित सर्व वारकऱ्यांना गोळ्या औषध व इंजेक्शन दिले. ही दिंडी कोल्हापूर जवळील हनुमंत वाडी या असून यावेळी 62 महिला व पुरुष वारकऱ्यांना अंग दुखणे, पाय दुखणे, सर्दी खोकला यावर तपासणी करून औषधे देण्यात आली.यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मा.श्रीपती अद्लिंगे सचिव मा. विजय म्हेत्रे , श्री. हळळीसागर ,श्री.ठोंबरे सर व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील, व सदस्य सौ मंगल चौगुले, सौ सुनंदा माळी, सौ प्रतिमा माळी, सौ दिपाली कोळसे पाटील या उपस्थित होत्या.

तसेच डॉक्टर्स डे चे औचित्य साधून या तिन्ही डॉक्टरांचा सत्कार इनर व्हील क्लबतर्फे करण्यात आला.
वारकऱ्यांच्या जेवणव्हील क्लबच्या सदस्य सौ सुनंदा माळी व सहकुटुंब यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button