चोपडी येथे नामदेव महाराज संजीवन सोहळा समाधी विविध कार्यक्रमांनी साजरा

नाझरा(वार्ताहार):- श्री संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा चोपडी येथील नामदेव मंदिरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 26 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध कार्यक्रमांचे व सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते

या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज सकाळी काकड आरती त्यानंतर सायंकाळी हरिपाठ व महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आमंत्रित केलेले नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन संपन्न झाले यामध्ये प्रतीक गुरव, हेमंत मराठे, सुशांत घोडके,ज्ञानेश्वर माऊली टेंभुकर, ज्ञानेश्वर माऊली हेटकळे,कृष्णाजी महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विविध संतांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन केले.आज शुक्रवारी पहाटे काकड आरती झाली
त्यानंतर सकाळी दहा वाजता कृष्णाजी महाराजांचे  काल्याचे किर्तन संपन्न झाले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सहा वाजता नामदेव महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक चोपडी गावातील विविध चौकातून काढण्यात आली. सदर संजीवन सोहळा यशस्वी करण्यासाठी चोपडी परिसरातील सर्व भजनी मंडळ त्याचबरोबर चोपडी ग्रामस्थ व समस्त शिंपी समाज यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button