अध्यापक विद्यालय एखतपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

अध्यापक विद्यालय एखतपूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अलिगावे एम.जी. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक कु. संध्या बिले यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले. यानंतर द्वितीय वर्षातील छात्राध्यापिकांनी स्वागतगीत सादर केले. नंतर उपस्थित अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यानंतर प्रथम वर्षातील कु. तमन्ना मुंढे ,कु. रोहिणी माळी यांनी मनोगत व्यक्त केले व द्वितीय वर्षातील कु.श्रावणी बनकर, श्री.संकल्प जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अलिगावे एम.जी. यांनी विचार व्यक्त केले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा, संघर्ष आणि यश याबद्दल विविध दाखले दिले.
कार्यक्रमासाठी प्राध्यापक श्री धोकटे सर ,प्राध्यापक श्री बंडगर सर ,श्री. गुळमिरे सर, प्राध्यापिका काटे मॅडम, प्रथम व द्वितीय वर्षातील छात्रशिक्षक व छात्रशिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गोडसे संस्कृती व कु. पालसांडे अमृता यांनी केले. कु. पायल कोळी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.