तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंदचे यश.

यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा , शिक्षण विभाग, पंचायत समिती सांगोला,सोलापूर डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सांगोला जिल्हा परिषद शाळा नंबर १ वरती १ ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा तीन ग्रुप मध्ये घेण्यात आल्या अनुक्रमे पाचवी ते सहावी ,सातवी ते आठवी आणि नववी ते दहावी. मुलांचा सर्वांगीण विकास घडावा त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढावे यासाठी संयोजकांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद मधील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.पाचवी ते सहावीच्या ग्रुप मध्ये इयत्ता सहावीची कु प्रिया मासाळ हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता सहावीतील तृप्ती भोसले हिने तृतीय क्रमांक, इयत्ता सातवीमधील कु वैष्णवी गायकवाड हिने चतुर्थ क्रमांक पटकावला .इयत्ता सहावीच्या प्रिया मासाळ हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .पाचवी ते सहावी गटात लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी तिन्ही क्रमांक पटकावले.
परीक्षकांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे खूप कौतुक केले . सातवी , आठवी मध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी अनुक्रमे ओम पाटणे, विघ्नेश विसापूरे, मयुरी बंडगर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. आठवीचे आयुष कोडग ,प्रतीक हिप्परकर स्पर्धेत सहभागी झाले होते. सातवी ते आठवी ग्रुप मधून आयुष कोडग याने चौथा क्रमांक पटकावला. तसेच नववी ते दहावी ग्रुपमधून नववीतील प्रणाली बुरंगे सहभागी झाली होती .सर्वच सहभागी विद्यार्थ्यांना संयोजकाकडून प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यातआले .या स्पर्धेत लक्ष्मीदेवीच्या विद्यार्थ्यांनी चार ट्रॉफीवर आपले नाव कोरले .बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कोळा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा अमोल भंडारी साहेब तसेच पंचायत समिती सांगोला शिक्षण विभागातील सौ मंगल घोळवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिक्षक सौ सुषमा ढेबे मॅडम तसेच सौ अर्चना बाबर मॅडम यांचे सहकार्य लाभले
या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन संस्था सदस्या सौ रजनी भोसले मॅडम यांनी अभिनंदन केले .यावेळी कॉलेजचे प्राचार्य श्री हेमंत आदलिंगे सर,मुख्याध्यापिका सौ पुष्पा महांकाळ मॅडम, पर्यवेक्षक श्री सुभाष आसबे सर, पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. इंग्रजी म्हटले की सगळे घाबरतात परंतु या मुलांनी तीन ते चार मिनिटे इंग्रजी भाषेमध्ये उत्कृष्ट असे वक्तृत्व केल्यामुळे सर्वच स्तरावरून या मुलांचे कौतुक होत आहे.