श्री क्षेत्र दत्त देवस्थान मोराळे येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नाझरे प्रतिनिधी:- गुरु विषयी अत्यंत आदर व्यक्त करणारी अशी माऊलीची रचना आहे. त्यांनी गुरु म्हणजे सुखाचा सागर आणि प्रेमाचा आगर आहे व गुरु साधकाला सहाय्य करतो व भक्ताची माय माऊली व त्याच्या घरी दुभणारी कामधेनु म्हणजे गुरु होय.
गुरुविन ज्ञान कहासे लावू हेच खरे आहे. गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही. म्हणूनच गुरु म्हणजे एक प्रसाद आहे व ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही व याचा प्रत्यय म्हणजे श्री क्षेत्र मोराळे येथे गुरु नरसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे व त्याची प्रचिती आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्तांना आली व मोठ्या भक्ती भावाने श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांची अनेक भक्तांनी दर्शन घेऊन जीवन कृतार्थ केले.
तर अनेक सेवेकरी यांनी श्री दत्त महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज, गुरुवर्य भालचंद्र पाटील काका, गुरुवर्य बंडू दादा उर्फ संतोष पाटील व ज्यांच्या नावात अफाट ताकद आहे असे शिवदत्त महाराज अशी बनवलेली फोटो फ्रेम देऊन जीवन कृतार्थ केले.
गुरु हा संत कुळीचा राजा,गुरु हा प्राण विसावा माझा. हे दाखवून देऊन गुरु विषयी भक्ती प्रकट केली. त्यावेळी गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे सुरेख प्रबोधन झाले व महाप्रसाद वाटप करण्यात आला व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.