नंदेश्वर येथे बाळकृष्ण माऊली मंदीरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नंदेश्वर (प्रतिनिधी)-नंदेश्वर ता- मंगळवेढा येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मंदिरात शनिवार दिनांक 20 जुलै रोजी रक्तदान शिबिर,कीर्तनसेवा व श्रीराम भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला.

रविवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी ठिक सात वाजता पुजा करण्यात आली.त्यांनतर नऊ वाजता मुंबई व धाराशिव येथील सद्गुरु महीला भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला व दहा वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते बाळकृष्ण माऊली यांची पाद्यपूजा करुन प्रवचन करण्यात आले व दुपारी ठिक १२ वाजता आरती होऊन महाप्रसादानंतर गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची उत्साहात सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी कर्नाटक,मुंबई धाराशिव,लातूर,कोकण विभागातुन गुरू बंधु-भगीनीं मोठ्या संख्येने नंदेश्वर येथे दाखल झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button