सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व पूर्व प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व पूर्व प्राथमिक विद्यालय येथे महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणजेच गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका कु सुकेशनी नागटिळक पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.रोहिणी महारनवर व संतोष बेहेरे यांच्या हस्ते महर्षी वेदव्यास व कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. यानंतर विद्यालयातील सहशिक्षिका कु. सविता गोडसे, लक्ष्मी स्वामी यांनी गुरूचे महत्त्व सांगितले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आदर भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले तर कु. सरिता कावळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.