स्वेरीच्या प्रगती साळुंखे व विजय भड यांची ‘त्रिवेणी टर्बाईन’ या  कंपनीत निवड

मिळाले वार्षिक रु. साडेपाच लाखांचे पॅकेज

पंढरपूरः त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रगती साळुंखे व विजय भड या विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       

  बेंगलोर येथील त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रगती सुरेश साळुंखे व विजय दत्तात्रय भड या दोन विद्यार्थ्याची निवड केली असून त्यांना प्रत्येकी वार्षिक रु. साडेपाच लाख इतके पॅकेज मिळाले आहे. त्रिवेणी टर्बाईन ही स्टीम टर्बाईन क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. प्रगती साळुंखे व विजय भड या दोघांनी पदवीच्या शिक्षणासाठी स्वेरीचे इंजिनिअरिंग कॉलेज निवडले आणि अत्यंत कष्टाने शिक्षण घेऊन हे यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांचे परिश्रमशिक्षकांचे प्रयत्न आणि स्वेरीतील शैक्षणिक कल्चर यामुळेच स्वेरीतील विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यातून स्वेरीवर असलेला पालकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत.

 

    या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अॅप्टिट्यूडकम्युनिकेशन स्किलएडवॉन्स टेक्निकल ट्रेनिंगमॉक इंटरव्यूवग्रुप डिस्कशनसॉफ्टवेअर ट्रेनींग या व्यतिरिक्त जागतिक स्तरावर संधी मिळण्यासाठी जापनीज लैंग्वेज ट्रेनींग तसेच जीआरईटोफेल या संदर्भात मार्गदर्शन केले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांचे व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विभागातील प्रगती साळुंखे व विजय भड यांचे अभिनंदन केले. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button