सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धा घेत दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
स्पर्धेच्या प्रारंभी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या शुभहस्ते लो टिळक, अण्णाभाऊ साठे व संस्थापक अध्यक्ष, गुरुवर्य कै.चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमांना पुष्पहार समर्पण करत पूजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरुटे, ज्येष्ठ शिक्षक चिंतामणी देशपांडे, वांडःमय विभाग प्रमुख शिवशंकर तटाळे, उन्मेष आटपाडीकर उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पाचवी-सहावी गटातून कुमारी श्रावणी दिलीप लवांडे – प्रथम क्रमांक, कुमारी संस्कृती भाग्यवंत बेहेरे – द्वितीय क्रमांक, कुमारी दिव्या पवन सावंत – तृतीय क्रमांक
इयत्ता सातवी-आठवी गटातून कुमारी संस्कृती संतोष लोंढे – प्रथम क्रमांक, कुमारी ईश्वरी सिद्धेश्वर घोरपडे व कुमारी भक्ती गणेश गुळमिरे – द्वितीय क्रमांक (विभागून), कुमारी गौरी नागेश लवटे – तृतीय क्रमांक
इयत्ता नववी-दहावी गटातून कुमारी सृष्टी दत्तात्रय वाघमारे – प्रथम क्रमांक, कुमारी सिद्धी अमोल उकळे – द्वितीय क्रमांक, कुमारी सलवा रसूल खतीब – तृतीय क्रमांक
इयत्ता अकरावी बारावी गटातून कुमारी स्नेहल लिंगराज बोधगिरे – प्रथम क्रमांक, कुमारी तृप्ती सुधाकर गेळे – द्वितीय क्रमांक, कुमारी सृष्टी हणमंत खंडागळे – तृतीय क्रमांक या स्पर्धकांनी आपल्या विषयाचे उत्तम सादरीकरण करत यश मिळवले.
वरील स्पर्धेवेळी आशितोष नष्टे, कविता राठोड, स्वाती चांदणे, सिताराम राऊत, दादासाहेब वाघमोडे, चंद्रकांत ढोले, शैलजा झपके, अनिता घोंगडे, उमेश नष्टे, इसाक मुल्ला, माधुरी पैलवान, सुवर्णा गायकवाड यांनी परीक्षक म्हणून काम केले.
यशस्वी स्पर्धकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके, प्राचार्य अमोल गायकवाड उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर, काकासाहेब नरूटे, ज्येष्ठ शिक्षक चिंतामणी देशपांडे यांनी अभिनंदन केले.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वांडःमय विभागातील धनाजी चव्हाण, सू-याबा आलदर, अर्चना कटरे, राधा रिटे, मेहेर ढवळे, प्रशांत रायचुरे, दत्तात्रय पाटील, संध्या तेली, श्रीकृष्ण वाघमारे, रूपाली सरगर, वसंत गुळमिरे, दत्तात्रय कांबळे, उत्सव विभागाचे तानसिंग माळी, बाळराजे सावंत, नरेंद्र होनराव यांच्यासह प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.