आ.शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने २४ ट्रान्सफार्मरसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून डीपीडीसी मधून २४ ट्रान्सफार्मरसाठी जिल्हा नियोजन समितीकडून २ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी महावितरणच्या कार्यालयाकडे पाठपुरावा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत सांगोल्यातील २४ ट्रान्सफॉर्मरसाठी सुमारे २ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सांगोला शहरातील चांडोलेवाडी-घाडगेवस्ती- इंगोले डीपी येथे ॲडीशनल डिपी बसवणे, पैलवान डीपी येथे ॲडीशनल डीपी बसवणे, शिवाजी नरुटे वस्ती येथे डीपी बसवणे, सातपुते वस्ती चिकमहूद येथे ॲडीशनल डीपी बसवणे, वाघमारे डीपी डोंगरगाव येथे ॲडीशनल डीपी बसवणे, श्रीमंत शिंदे वस्ती अजनाळे ॲडीशनल डीपी बसवणे, ठेंगील डीपी कटफळ येथे ॲडीशनल डीपी बसवणे, अंकुश आलदर शेत बिरा पंच वस्ती येथे ॲडीशनल डीपी बसवणे, नायकुडे साळुंखे मळा कटफळ येथे ॲडीशनल डीपी बसवणे, पवार डीपी नं.३ संगेवाडी येथे ॲडीशनल डीपी बसवणे, वाकी शिवणे येथे ६३ चा डीपी १०० चा करणे, हलदहिवडी येथील सरकारी दवाखान्याजवळ ॲडीशनल डीपी बसवणे, ढाळे वस्ती महूद येथे ॲडीशनल डीपी बसवणे, बजबळकर कुटे वस्ती य.मंगेवाडी येथे ॲडीशनल डीपी बसवणे, दिवसे वस्ती आलेगांव येथे ॲडीशनल डीपी बसवणे, डोंगरे वस्ती नाझरे येथे भगीरथ डीपी बसवणे, मोहिते मळा तिप्पेहाळी येथे ॲडीशनल डीपी बसवणे, इंगोले डीपी पाचेगांव बु. येथे ॲडीशनल डीपी बसवणे, खंडागळे डीपी सोनंद येथे ॲडीशनल डीपी बसवणे, व्हराडे डीपी वाटंबरे येथे ॲडीशनल डीपी बसवणे, लवटे वस्ती निजामपूर येथे ॲडीशनल डीपी बसवणे, साळुंखे वस्ती पारे येथे ॲडीशनल डीपी बसवणे, वकील डीपी अकोला येथे ॲडीशनल डीपी बसवणे, चौगुलेवाडी भाळवणी येथील नवनाथ चौगुले यांच्या शेतात डीपी करणे अशा २२ ठिकाणी ॲडीशनल डीपी बसवण्यासाठी २ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मतदारसंघात नवीन अतिरिक्त ट्रान्सफार्मरसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या २ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांच्या निधीमुळे तालुक्यातील शेतकर्यांना अपुर्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. भविष्यात पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार असल्याने शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
–