नाझरा विद्यामंदिर प्रशालेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नाझरा(वार्ताहर):- नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये महर्षी व्यासांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे व महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य बिभीषण माने, यांच्या हस्ते व पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थी रोहन पांढरे,ओम गुरव यांनी विविध प्रकारची उदाहरणे देत आपल्या जीवनात गुरूंचे महात्म्य कसे आहे याबद्दल आपले विचार व्यक्त केले.प्रशालेतील शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीवर अतिशय खुमाशदार कविता साक्षी बाबर हिने सादर केली तसेच श्रेया चव्हाण यांनी गुरु महात्म्यावर कविता सादर केली. त्यानंतर प्रशालेतील शिक्षक दीपक शिंदे यांनी भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने आलेल्या गुरुचे स्थान प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे याबद्दल विविध उदाहरणांसह आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. गुरूंचे महत्त्व विशद करणारी गुरुपौर्णिमा साजरी होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारे चैतन्य गुरूं बद्दलचा आदरभाव व्यक्त करत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक महेश विभुते यांनी मानले.