उत्कर्ष विद्यालयात निनादले अभंगाचे स्वर

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित, उत्कर्ष माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून गंधर्व कुलातर्फे अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केलेले होते.
विद्यार्थ्यांना संत साहित्याची माहिती व्हावी व संतांचे अभंग आत्मसात करावे या हेतूने या स्पर्धेचे नियोजन केलेले होते.

एकूण पाचवी ते दहावीमधील एकूण 70 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. सदरची स्पर्धा ही निवड चाचणी व अंतिम फेरी या दोन विभागांमध्ये घेण्यात आली, अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे 18 तारखेला स्पर्धा झाली.

त्यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे दोन गट होते .इयत्ता पाचवी मधून श्रुती बनकर हिने प्रथम क्रमांक मिळवला, आराध्या नवले द्वितीय क्रमांक व अनुष्का बनकर ही तृतीय क्रमांक मिळवला तर सहावी मधून अंबादास मेटकरी याने प्रथम क्रमांक, वेदांगी शिंदे हिने द्वितीय क्रमांक व महादेव बुरंगे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता सातवी मधून शुभदा वांगीकर प्रथम क्रमांक, सई बाबर हीने द्वितीय क्रमांक तर महादेव बुरंगे याने तृतीय क्रमांक पटकावला ,इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी- अश्विनी कांबळे व सौ. माधवी लाटणे या परीक्षक म्हणून लाभलेल्या होत्या.

तर आठवी ते दहावी या गटामधून एकूण 25 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. इयत्ता आठवी मधून प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी भाकरे ,द्वितीय क्रमांक श्रेयस बनकर व तृतीय क्रमांक ओम उबाळे याने प्राप्त केला. तर इयत्ता नववी मधून प्रसाद काशीद याने प्रथम क्रमांक साक्षी कीरकत हिने द्वितीय क्रमांक व सानिका दिवटे हिने तृतीय क्रमांक मिळवला ,तर इयत्ता दहावी मधून रेणुका दिवटे हिने प्रथम क्रमांक, स्वरश्री देशपांडे ही द्वितीय क्रमांक व सिद्धी दिवटे तृतीय क्रमांक मिळवला, आठवी ते दहावी या गटासाठी- माननीय- श्री. दयानंद बनकर सर व श्री. अतुल उकळे सर यांनी परीक्षण केलेले होते .

.सौ.अश्विनी कांबळे व अतुल उकळे सर यांनी मनोगतातून शाळेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना स्वर, ताल यांचे मार्गदर्शन केले. व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वरील स्पर्धेसाठी उपस्थित मुख्याध्यापक -माननीय- श्री. सुनील कुलकर्णी सर, पर्यवेक्षक -भोसले सर, मिसाळ सर ,गंधर्व कुल मार्गदर्शिका- अनुराधा लिंगे मॅडम, कुल प्रमुख- शितल भिंगे मॅडम व संगीत शिक्षिका- शुभांगी कवठेकर मॅडम यांच्या नियोजनाखाली ही अभंग स्पर्धा उत्तम रीतीने पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button