“रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे डाळिंब शेती धोक्यात” डाळिंबरत्न बी.टी.गोरे सर
सांगोला येथे शाश्वत डाळिंब मार्गदर्शन शिबिर

सांगोला-डाळिंब शेतीमध्ये दर्जेदार व जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवणाऱ्या आणि जीआय नामांकन असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे डाळिंब जागतिक स्तरावर पोहोचले आहे. डाळिंब शेती हे निसर्गाने या परिसराला दिलेले वरदान आहे. मात्र येथील बागा कमी होण्यास सिंचनाचे अयोग्य नियोजन, पिनहोल, तेल्या, मर त्याचबरोबर रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर कारणीभूत आहे असे मत डाळिंबरत्न डॉक्टर बी .टी. गोरे सर यांनी व्यक्त केले.
सांगोला येथील डाळिंब क्षेत्र अनेक कारणामुळे कमी होत आहे व अनेक समस्यांनी डाळिंब क्षेत्र ग्रासलेले आहे या पार्श्वभूमीवर वाटंबरेचे यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे संचालक श्री सुरेश पवार नाझरा येथील प्रगतशील डाळिंब उत्पादक व मार्गदर्शक श्री विजयसिंह वराडे आणि के.जी.एन. डाळिंब फार्म नाझराचे श्री अशपाक काझी सर यांनी डाळिंब शेती पूर्ववत होण्यासाठी सांगोला येथील मुक्ताई रिसॉर्ट येथे “शाश्वत डाळिंब मार्गदर्शन शिबिर चे” आयोजनकेले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पदी सांगोला तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी शिंदे, सांगोला पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री खंनदाळे साहेब, भूमी अभिलेख कार्यालय सांगोलाच्या अधिकारी सौ रेश्मा तांबेरे मॅडम यांच्यासह तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते व सुमारे बाराशे डाळिंब शेतकरी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कंपन्यांचे सहकार्य लाभले.
डॉक्टर गोरे म्हणाले, तेल्या मरोग पिनहोल निमित्तोड यामुळे फळबागा मोठ्या संकटात आहेत नवीन शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध लागवडीचे तंत्र आत्मसात करून पावसाळ्यात डाळिंब लागवड न करता हिवाळ्यात लागवड केल्यास उत्पादनात नक्कीच भर पडेल .रोग ही संकल्पना समजावून सांगून कंपोस्ट खत, गांडूळ खत, सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर योग्य फवारण्या फवारण्याची वेळापत्रक रोग नियंत्रणाचे जैविक व अजैविक घटक फळांची गुणवत्ता व उत्पादन घटनेची कारणे गोरे सरांनी सविस्तर सांगितले. जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवून सुपीक तिकडे लक्ष द्यावे .रोग येण्याचे अवस्था आणि हवामान यांचा अभ्यास करून फवारणी करावी असेही सरांनी सांगितले. माती ,मूळ, खोड पाने फळांची घ्यायची काळजी याबाबत सर्व तांत्रिक मुद्दे विस्तृत मांडले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अनेक शेतकऱ्यांनी आयोजकांचे आणि गोरे सरांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधुरी जाधव मॅडम, प्रास्ताविक श्री अशपाक काझी सर तर आभार श्री सुरेश पवार यांनी मांनले.