मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मातोश्री गिरीजाबाई ढोबळे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली.सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आपले मत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटकार्ड व गुलाब देऊन त्यांचा सत्कार केला व तसेच सौ चांडोले मॅडम व रणदिवे मॅडम यांनी गुरूंविषयी माहिती सांगितली
गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे सौ खातिब मॅडम यांनी गुरु विषयी आपले मत व्यक्त केले व तसेच विभाग प्रमुख सौ शिंदे मॅडम यांनी गुरु विषयी मत व्यक्त केले.. शाळेमध्ये गुरुपौर्णिमा ही सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्साहात साजरी केली.