सांगोला:सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख महाराष्ट्र राज्य ग्रंथालय, वाचनालय समितीकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.पाठिंबाचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रंथालय, वाचनालय समिती, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक / अध्यक्ष मधुकरराव पारसे यांनी दिले
पाठिंबा पत्रात राज्यात ग्रंथालय, वाचनालयाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.डॉ.बाबासाहेब देशमुख साहेब यांना ग्रंथालय, वाचनालयाच्या प्रश्नाची जाण आहे. आमच्या ग्रंथालय, वाचनालयाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत सोडविण्यासाठी आपलेकडून प्रयत्न व्हावेत. अशी अपेक्षा आहे.
यापूर्वीच्या काळात राज्यातील ग्रंथालय, वाचनालयाबाबत सर्वांगीण प्रश्नावर आपण यापूर्वी चांगले काम केले असून आपण या विषयावर निश्चितपणे न्याय दयाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणून मी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय व वाचनालय समिती, महाराष्ट्र राज्य या माझे संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष या नात्याने सांगोला विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहिर पाठिंबा देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानत वाचनालय व ग्रंथालय संदर्भातील शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी दिला.