शिवणे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

शिवणे वार्ताहर- शैक्षणिक वर्ष 2023-24मधील इयत्ता 10 वी च्या मुलांचा शुभेच्छा समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक हेमंत रायगावकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप विद्यालय सांगोला चे दिनेश सुरवसे हे होते.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्या नंतर विध्यार्थी मनोगतातून कु.गौरी नवले,कु.प्रणिती घाडगे,कु.पायल नलवडे, कु.प्रीती घाडगे, कु.साक्षी चव्हाण,कु.श्रुती काकडे,कु.प्रतीक्षा ठोंबरे,ओंकार गुजरे या सर्वांनी प्रशालेच्या आठवणी सांगून कृज्ञनता व्यक्त केली.सर्वजण भावुक झाले होते.आपल्या मार्गदर्शनातून पर्यवेक्षक हेमंत रायगावकर व शिक्षिका मीरा देशमुख यांनी लहान लहान प्रबोधनात्मक गोष्टी सांगून सर्व मुलांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे श्री.दिनेश सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून जीवनाचे करिअर निवडताना जे आवडते तेच स्वीकारा .त्यासाठी शालेय जीवनात जे ज्ञान आपणास मिळाले ते आपल्या भावी जीवनासाठी आणि शिक्षणासाठी निश्चित उपयोगी पडते याचा आपण कधीच विसर पडला नाही पाहिजे.
प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की, शाळेत आपला शारीरिक,मानसिक,बौद्धिक विकासासाठी विविध प्रयत्न केलेले आहे त्याचा उपयोग करून आपल्या जीवनातील उच्च शिखरे गाठावी व प्रशालेचे नाव उज्जवल करावे.
शुभेच्छा समारंभा निमित्त 2023-24या बॅच च्या मुलांनी प्रशालेस 2 फलक भेट दिले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशवंत नरळे यांनी केले तर आभार श्री.विजयकुमार जानकर सर यांनी मानले.