सांगोला विद्यामंदिरमध्ये कृष्ठरोगासंदर्भात विद्यार्थ्यांना मौलिक प्रबोधन

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कुष्ठरोग मुक्त भारत अभियाना अंतर्गत सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग सोलापूर डॉ.मोहन शेगर यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मौलिक प्रबोधन केले.
यावेळी व्यासपीठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर, जिल्हा पर्यवेक्षक कुष्ठरोग विक्रम साळुंखे, कुष्ठरोग तंत्रज्ञ एस. एस.मलपे,सांगोला ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवक अरुण कोळी, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद पर्यवेक्षक बिभीषण माने उपस्थित होते.
यावेळी डॉ.शेगर यांनी कृष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्त्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. परंतु लवकर तपासणी करून उपचाराने कृष्ठरोगापासून मुक्तता मिळतेव शारीरिक विकृती टाळता येतात असे सांगत कुष्ठरोग लक्षणे व उपचार याविषयी मौलिक प्रबोधन केले.
तसेच तालुका आरोग्य अधिकारी अविनाश खांडेकर व जिल्हा पर्यवेक्षक विक्रम साळुंखे यांनी कुष्ठरोग हा अनुवंशिक नाही असे सांगत त्या संदर्भातले गैरसमज, अंधश्रद्धा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व आपणास व आपल्या परिवारातील कोणालाही कुष्ठरोगाची लक्षणे दिसत असल्यास लवकर दवाखान्यात जावे. निदान करावे व योग्य उपचार घ्यावे तसेच आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी व्यवस्थित आहार व भरपूर पाणी घेण्याचा सल्ला दिला. यावेळी स्पर्श जनजागृती अभियाना अंतर्गत कुष्ठरोग निवारण संदर्भात सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.सूत्रसंचालन नागेश भोसले यांनी केले तर पर्यवेक्षक बिभीषण माने यांनी आभार प्रदर्शन केले.