न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला मध्ये गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न
संकेत काळे शरीरसौष्ठव स्पर्धेत देशात दुसरा तर विराज गाडेकरला जे ई ई मेन्स परीक्षेत 98.24 परसेंटाईल

आंतरराष्ट्रीय पातळीवरती शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवणारा संकेत काळे व जे ई ई मेन 2024 पहिल्याच प्रयत्नात 98.24 परसेंटाईल मिळवणारा विराज सुरेश गाडेकर व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोलाच्या भव्य मैदानावरती करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे सर होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य प्रा डॉ अशोक शिंदे होते. प्रारंभी या सत्कारमुर्तीचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या शुभस्ते करण्यात आला. यावेळी संस्था सदस्य प्राध्यापक दीपक खटकाळे, उपमुख्याध्यापक नामदेव कोळेकर, उप प्राचार्य केशव माने सर, पर्यवेक्षक श्री संजय शिंगाडे सर, न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात बोलताना प्रा डॉ अशोक शिंदे यांनी विध्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त गुण ओळखून त्याप्रमाणे कष्ट केले तर संकेत काळे व विराज गाडेकर सारखं यश तुम्हीसुद्धा मिळवू शकाल, असे सांगितले.
यावेळी विराज गाडेकर आणि संकेत काळे यानी आपली मनोगते व्यक्त केली.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन करताना प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी विध्यार्थ्यानी आपले ध्येय आत्ताच ठरवले पाहिजे व त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे, म्हणजे या दोघांसारखे यश तुम्हीसुद्धा मिळवू शकाल,असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा देवेन लवटे यांनी केले तर आभार प्रा हनुमंत श्रीराम यांनी मानले.