नीरेच्या पाण्यातून तिसंगी आणि चिंचोलीसह सर्व छोटे मोठे तलाव भरून द्यावेत ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची आग्रही मागणी

नीरेच्या पाण्यातून तिसंगी आणि चिंचोलीसह सर्व छोटे मोठे तलाव भरून द्यावेत ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची आग्रही मागणी

चिंचोली तलावाला टेल टँक जाहीर करण्याची केली महत्त्वपूर्ण मागणी

सांगोला ; तालुका प्रतिनिधी

नीरा नदीवरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीला सोडण्याऐवजी दुष्काळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी चिंचोली सह लाभक्षेत्रातील छोट्या-मठ्या तलावांना सोडण्यात यावे. तसेच तिसंगी प्रमाणे चिंचोली तलावालाही निरा उजवा योजनेचा टेल टॅंक म्हणून जाहीर करावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कपोले यांच्याकडे केली.

उन्हाळी आवर्तन २०२४ मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील काही फाट्यांना अपुरे पाणी मिळाले होते यामुळे निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. तसेच गेल्या आवर्तनात तिसंगी चिंचोली सह लाभक्षेत्रातील अन्य छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने या तलावाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतीची तहानही भागली नव्हती. सध्या धरणात प्रचंड पाणीसाठा उपलब्ध आहे तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. त्यामुळे सध्या तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे धरणातील अतिरिक्त पाणी नीरा उजवा कालव्यातून तिसंगी आणि चिंचोली हे मोठे तलाव तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील निरा उजवा कालव्यावर असणारे छोटे तलाव आणि सांगोला शाखा कालव्याला पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी या मागणी वेळी आवर्जून नमूद केले.

 

१) चिंचोली तलाव टेल टॅंक म्हणून जाहीर करावा

निरा उजवा कालव्याच्या तळाला किंवा टेल ला असणारा चिंचोली तलाव हा टेल टॅंक म्हणून जाहीर करावा. आणि दरवर्षी हा तलाव नियमितपणे नीरा उजवा कालव्याच्या पाण्यातून भरून द्यावा अशी महत्वपूर्ण मागणीही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली. चिंचोली तलावात नियमितपणे पाणी सोडल्यास या पाण्यातून चिंचोली, सांगोला आणि बामणी या गावातील हजारो शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होणार आहे. आणि या पाण्यातून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button