फॅबटेक च्या धनराज हाके याची टी.सी.एस. कंपनीत निवड

सांगोला : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.) भारतातील माहिती तंत्रज्ञान (आय.टी) क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था असलेल्या या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, मधील कॉम्पुटर सायन्स विभागातील धनराज हाके याची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड झाली आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे यांनी दिली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टी.सी.एस.)कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीत फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च च्या कॉम्पुटर सायन्स विभागातील धनराज हाके याची निवड केली असून त्याला प्रत्येकी वार्षिक रु.३.३६ लाख इतके पॅकेज मिळाले आहे. टी.सी.एस हि भारतातील एक माहिती तंत्रज्ञान (आय.टी) क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.
टी.सी.एस.मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ .अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ.आर.बी.शेंडगे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे व सर्व विभाग प्रमुख , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.